मंगळवार, २३ मार्च, २०१०

Daddy's shoes...

तुम्ही नीट निरीक्षण केले असेल तर बघा लहान मुले त्यांच्या बाबांचे जोडे घालून घरभर मिरवतात .....सर्वच घरात हा scene common असेल.........माझा मुलगाही तेच करतो आणि कदाचित मीही करत असेल माझ्या लहानपणी....अगदीच लहानपणाचे आठवत नाही पण जसे समजायला लागले तसे मला दादांच्या (माझे वडील आम्ही त्यांना दादा म्हणतो ) चपलेचे ( नाकाची चप्पल) भयंक आकर्षण....it was always a comfort in it

आमचे दादा साधे सिम्पल ...पांढरा सदरा आणि त्यावर किंचित काळी/करडी तत्सम संगाची विजार.. असा त्याचं पेहराव...जेव्हा पासून मला आठवते तेव्हा पासून पांढरा सदरा हा fix...अजूनही तसेच...साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा त्यांचा नियम..(...उच्च विचारसरणी ठीक आहे पण साधी राहणी :(.. तेही कॉलेजात गेल्यावर ......)

मोठी family ..सुरुवातीला सर्व मुली, मग मी आणि लहान दोघे...एवढ्या सर्वांकडे लक्ष देणे...शेती...नोकरी.. आजी आजोबा ....लहान काका ....अशा त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी आम्हाला लहानाचे मोठे केले...आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच...नोकरीत कसले भागते.. त्यामुळे शेती आणि प्लॉट चा व्यवसाय...ह्यासर्वात त्यांना आमच्यासाठी फारसा वेळ नसायचा...काही हवे असेल तर आईला सांगायचे आणि मग मूड बघून ती दादांना सांगणार....फालतू लाड चालत नसत....दिवाळीचा ड्रेस आणि शाळेचा गणवेश हेच काय तर दोन ड्रेस वर्षातून एकदा मिळत.

दादांचा सुरुवातीपासूनच धाक ....प्रगती पुस्तकावर सही आणि शाळेची फी...एवढ्याच विषयावर काय ते बोलत असू ....दिवस भरात एकदा तरी नक्की विचारणार....काय रे अभ्यास कसा चाललाय ?...बघू तुझी वही ????....मित्रही घाबरायचे :)

दादा स्वतः पुण्यात शिकले ...त्यांच्या काळात... म्हणजे जवळपास ५० वर्षापूर्वी...छोट्याशा खेड्यातून...किमान ३०० किलोमीटर दूर असलेल्या पुण्यात ते आले...परिस्थितीमुळे शिक्षण सोडले आणि नोकरीला लागले...बाहेर पडल्यामुळे विचार बदलले...मला नेहमी सांगत ....भाऊ आपली संपत्ती म्हणजे आपले शिक्षण...आपल्याकडे दुसरे काही नाही जे तुला पुढे घेऊन जाईल...

लहानाचा मोठा झालो ...कॉलेजला गेलो...तेव्हा मात्र आमचे वाद व्हायला लागले....कारण त्यांचे सर्वच नियमात....आणि आपला सगळाच गोंधळ (हे त्यांचे मत...).. मग काही जमेना...शाब्दिक चकमकी तर वरचे वर होत...मग आईच काय तो मार्ग काढत असे. होस्टेल मध्ये राहायचो..महिन्याचा खर्च मागितल्या पेक्षा नेहमी कमीच मिळायचा...ते त्यांच्या काळातले calculation करायचे...आणि ते काही आमच्या काळात match होत नसायचे.......मग पुन्हा चिडचिड....त्यांचीही आणि आमचीही......मी एक पेन ५ वर्षे वापरला आणि तुम्हाला तुमच्या साध्या वस्तू सुद्धा सांभाळता येत नाहीत ???....मग... पैसे कमवायची अक्कल नाही...... वगैरे....... ऐकावे लागायचे....खरे सांगायचे तर फार राग यायचा....मनात यायचे ह्यांना प्रत्येक गोष्टीत आपल्या चुकाच दिसतात ........असे अनेक किस्से.....एकदा तर महिनाभर बोललो नाही आम्ही...........मला तर दादाच चुकीचे वाटायला लागले ..

आज इतक्या वर्षानंतर हे सारे काही आठवते आहे जसे च्या तसे .....आता मीही बाबा झालोय....bread & butter च्या मागे धावतोय..... जबाबदारीत कुठे कमी नको पडायला ह्याची काळजी घेतोय...... कामाच्या व्यापात मुलांना फारसा वेळ देत नाही खरा .... पण करणार काय.....काळ बदललाय ...स्पर्धा......माझं करियर....वाढती महागाई......सर्व गणितच बदललेय.......

तशी परिस्थिती चांगली आहे ......मुलाने काहीही मागितले तरी लगेच घेऊन देऊ शकतो......पण देत नाही...कारण त्याच्या सर्वच demand योग्य वाटत नाही...games ..CD 's ...PSP ....कशाला हव्यात नसत्या भानगडी ?.....मागितले आणि मिळाले कि त्याची किंमत राहत नाही......मनात येते ....मी एक bag ३ वर्षे वापरली आणि ह्याला प्रत्येक वर्षी नवीन bag ....रागावलो कि मीही बडबडतो.... अभ्यासाचे काय ???......शाळेला दांडी मारायची नाही....TV थोडा कमी बघा आणि अभ्यासात लक्ष घाला .....फालतू लाड नाही चालणार....बायको बोलते...लहान आहे रे तो.....समजेल त्याला सर्व काही थोडा मोठा होऊदे ....मलाही कळते सारे....असेही रागवताना मला का आनंद होतो ? ...पण प्रसंगी कठोर व्हावेच लागते ......जग बदलतंय.... मोठा झाल्यावर ह्या जगाला तोंड देण्याची हिम्मत हवी...आणि ती आपणच दिली पाहिजे......मी आहेच त्याच्या पाठीशी....पण माझ्याशिवाय चालला तरच माझ्यातला बाबा जिंकेल .....माझे रागावणे दिसते पण त्या मागची काळजी, प्रेम हे नाही दिसत कोणाला.......आणि हा सारा आटापिटा त्यांच्यासाठीच ना ....

आता कळतंय... मला रागवताना दादानाही कुठे आनंद होत असेल...त्यानाही हेच वाटत असेल जे आज मला वाटते आहे.....मीही दादांसारखा वागायला लागलो आहे .....माझ्या बोलण्यात, चालण्यात त्यांना अनुभवतोय......प्रत्तेक दिवस मी त्यांना माझ्यात जगतोय....now I am in my Daddy 's shoes, can feel the same comfort.

Yeah.....everyday i see....a little more of father in me !!!!!!!!

कदाचित त्त्यामुळेच सर्व मुलांना बाबाच्या बुटाचे आकर्षण असेल ....कारण कधीतरी...तोही त्या बुटात उभा राहून जगाकडे बघणार असतो आणि बाबाचे आयुष्य, स्वप्न जगणार असतो....माझां मुलगाही मला समजून घेईल...when he will be in my shoes !!!!!!!!!!!!!!!!

आता दादा मित्रासारखे वाटतात....नव्हे मित्रच झालेत ते.....Happy Birthday Dad !!!!!!!!!!


Commit all your sins when he is batting.....




सचिन तेंडूलकर !!! ....तेंडल्या साठी introduction ची काहीही गरज नाही.

तेंडल्या म्हणजे wonder boy...little मास्टर...मास्टर ब्लास्टर...क्रिकेट विश्वाचा Hero. मी तर बोलेन सचिन म्हणजे चमत्कार, कारण मला वाटते, असे लोक जन्मालाच यावे लागतात.......
हल्ली फारसे क्रिकेट पहाणे होत नाही किवा इत्यंभूत माहितीही नसते but I love Cricket like all Indians :)

सचिन मधे प्रचंड Passion आणि Determination आहें क्रिकेट साठी.. क्रिकेट हेच जीवन असले तरीही सातत्य टिकवून ठेवणे सोपे नसते.....पहिला येणे सोपे, पण पहिला येत रहाणे फार कठीण !!!

तेंडल्याने मात्र सातत्य टिकवून ठेवले आहें. सामान्य माणसा प्रमाने त्यानेही संघर्ष केला आहें......होय १९८७ च्या विश्वकप semi final सामन्यात सचिन ball boy होता, भारत विरुद्ध इंग्लंड @ वानखेडे (from in.com).....क्रिकेट खेलताना अनेक चढ़ उतार त्यानेही अनुभवले आहेत. आज सर्वच त्याचे कौतुक करतात......तसेच त्याच्या बद्दल वाईटही बोलले गेले आहें. Extremely Down-to-Earth and modest....शतक झळकावले की शांत पणे Bat उंचावून...आकाशाकडे बघत अभिवादन करने ही त्याची स्टाइल .....तुम्ही त्याला शतक केल्यानंतर आनंदाने उड्या मारताना किवा ९९ वर आउट झाल्यावर रडताना पाहिले आहें ??? कदाचित नाही... कारण तेंडल्या नेहमी स्थिर असतो ( हो भारत सामना जिंकल्यावर सगळेच उड्या मारतात तेंडल्या सहित...कारण तो विजयाचा आनंद असतो :) ).

सचिन खेळतो तेव्हा रस्ते ओस पडतात.....कामे थांबतात.......एकदम शांतता आणि अचानक जल्लोष ( मारला असणार), दुकानात किवा हॉटेल मधे असाल तर तुम्हाला better सर्विस मिळत नाही आणि तुम्हालाही ते लक्षात येत नाही किवां तुम्ही दुर्लक्ष करतात कारण तूमचे लक्षही समोर लावलेल्या छोट्या टीवी वर/ हल्ली LCD किवा FM / रेडियो वर असते....ऑफिसमध्ये कामात लक्ष नसते आणि online score चेक होत असतो...updates / SMS सुरु असतात...तशी हि परिस्थिती भारताच्या almost सर्वच सामन्यांसाठी असते...पण सचिन बाद झाल्यावर ती बदलते... हे मान्य करायला हवे.....मला असेही काही लोक माहित आहेत जे सचिन बाद झाल्यावर TV बंद करून कामाला लागतात !!!

तेंडल्याच्या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे चौफेर फटकेबाजी..कमी धावणे आणि जास्त hits ...यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून पाठी मारलेला तर ultimate !!!

रेकॉर्ड्स विषयी बोलायाचेच झाले, तर कित्येक रेकॉर्ड्स आहेत पठठ्याच्या नावावर ....आणि आतातर २००* !!! another world record.

Idiot च्या भाषेत...हा एक Idiot....just run behind the excellence and success will follow you !!!

आता ह्या चमत्काराबद्दल मी फार काय बोलणार... त्यापेक्षा बघूया कोण कोण काय काय बोलतात ते...

"We did not lose to a team called India ...we lost to a man called सचिन."
- मार्क टेलर, चेन्नई टेस्ट (१९९७)

"There are 2 kinds of batsmen in the world. One सचिन तेंडूलकर.... Two all the others"
- Andy flower

"I have seen God .... he bats at no.4 for India "
- Mathew Hayden

"Sometimes you get so engrossed in watching batsmen like राहुल द्रविड and सचिन तेंडूलकर that you lose focus on your job."
- Yaseer Hameed from Pakistan newspaper.

"To सचिन, the man we all want to be"
- Andrew Symonds wrote on an aussie t-shirt he autographed specially for सचिन.

“Beneath the helmet, under that unruly curly hair, inside the cranium,there is something we don't know, something beyond scientific measure. Something that allows him to soar, to roam a territory of sport that, forget us, even those who are gifted enough to play alongside him cannot even fathom. When he goes out to bat, people switch on their TV sets and switch off their lives."
- BBC on सचिन.

"तुझे पता हें.. तुने किसका कॅच छोडा हें ???" :(
- Wasim Akram to Abdul Razzaq when the latter dropped Sachin's catch in 2003 WC.

सचिन is a genius. I'm a mere mortal. - ब्रायन चार्ल्स लारा

"The more I see of him the more confused I'm getting to which is his best knock." -
एम् एल जयसिम्हा

"The joy he brings to the millions of his countrymen, the grace with which he handles all the adulation and the expectations and his innate humility - all make for a one-in-a-billion individual," - ग्लेन मैकग्राथ

"I can be hundred per cent sure that सचिन will not play for a minute longer when he is not enjoying himself. He is still so eager to go out there and play. He will play as long as he feels he can," - अंजली तेंडूलकर

Question: Who do you think as most important celebrity ?
शाहरुख - There was a party where stars from bollywood and cricket were invited. Suddenly, there was a big noise, all wanted to see approaching Amitabh Bachhan. Then Sachin entered the hall and Amitabh was leading the queue to get a grab of the GENIUS!!!
- Shah Rukh Khan in an interview.

"He can play that leg glance with a walking stick also."
- वकार यूनिस

Sachin Tendulkar has often reminded me of a veteran army colonel who has many medals on his chest to show how he has conquered bowlers all over the world. I was bowling to Sachin and he hit me for two fours in a row. One from point and the other in between point and gully. That was the last two balls of the over and the over after that we (SA) took a wicket and during the group meeting i told Jonty (Rhodes) to be alert and i know a way to pin Sachin. And i delivered the first ball of my next over and it was a fuller length delevery outside offstump. And i shouted catch. To my astonishment the ball was hit to the cover boundary. Such was the brilliance of सचिन. His reflex time is the best i have ever seen. Its like 1/20th of a sec. To get his wicket better not prepare. At-least you wont regret if he hits you for boundaries.
- अलन डोनाल्ड

On a train from Shimla to Delhi , there was a halt in one of the stations. The train stopped by for few minutes as usual. Sachin was nearing century, batting on 98. The passengers, railway officials, everyone on the train waited for Sachin to complete the century. This Genius can stop time in India !!
- Peter Rebouck - Aussie journalist

“Cricket was not there in ancient ages, otherwise Cricket would be the God’s game, and सचिन be the 11th incarnation in इंडिया .
- हरी पटनायक

"सचिन cannot cheat. He is to cricket what Mahatma Gandhiji was to politics. It's clear discrimination. "
- NKP Salve, former Union Minister when Sachin was accused of ball tempering

"Commit all your sins when Sachin is batting. They will go unnoticed cause even the GOD is busy in watching" - A hoarding in England

त्याला भारत रत्न केव्हा देणार हे माहित नाही ....but I believe this is what is called HONOR.

आता मला सांगा... जर इंग्लंड क्रिकेटची पंढरी...तर सचिन विठोबा... नाही का ???


*** सौजन्य - Google, you tube आणि माझे सर्व माहित असलेले /नसलेले मित्र जे email forward करत असतात :)

सोमवार, ८ मार्च, २०१०

Shivba

समर्थ रामदास स्वामिनी लिहिलेले पत्र -

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांस अधारु |
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी || 1 ||

परोपकाराचिया राशी, उदंड घडती जयाशी |
जयाचे गुणमहत्वाशी, तुलना कैशी || 2 ||

नरपति हयपति, गजपति गडपति |
पुरंधर आणि शक्ति, पृष्ठभागी || 3 ||

यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत |
पुण्यवंत आणि जयवंत, जाणता राजा || 4 ||

आचारशील विचारशील, दानशील धर्मशील |
सर्वज्ञपणे सुशील, सर्वाठायी || 5 ||

धीर उदार सुंदर, शुरक्रियेसी तत्पर |
सावधपणेसी नृपवर, तुच्छ केले || 6 ||

तीर्थक्षेत्रे ती मोडिली, ब्राम्हणस्थाने बिघडली |
सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला || 7 ||

देवधर्म गोब्राम्हण, करावयासी रक्षण |
हृदायस्त झाला नारायण, प्रेरणा केली || ८ ||

उदंड पंडित पुराणिक, कविश्वर यज्ञिक वैदिक |
धूर्त तार्किक सभानायक, तुमचे ठायी || ९ ||

या भूमंडळाचे ठायी, धर्म रक्षी ऐसा नाही |
महाराष्ट्रधर्म राहिला काही, तुम्हा करीता || १० ||

आणखी काही धर्म चालती, श्रीमंत होउनी कित्येक असती |
धन्य धन्य तुमची कीर्ति, विस्तारली || ११ ||

कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकांस धाक सुटले |
कित्येकांसी आश्रय झाले, शिवकल्याण राजा || १२ ||

तुमचे देशी वास्तव्य केले, परन्तु वर्त्तमान नाही घेतले |
ऋणानुबन्धे विस्मरण जाहले, बा काय नेणु || १३ ||

सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ति, सांगणे काय तुम्हा प्रति |
धर्मास्थापनेची कीर्ति, सांभाळली पाहिजे || १४ ||

उदंड राजकारण तटले, तेथे चित्त विभागले |
प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे || १५ ||