मंगळवार, २३ मार्च, २०१०

Daddy's shoes...

तुम्ही नीट निरीक्षण केले असेल तर बघा लहान मुले त्यांच्या बाबांचे जोडे घालून घरभर मिरवतात .....सर्वच घरात हा scene common असेल.........माझा मुलगाही तेच करतो आणि कदाचित मीही करत असेल माझ्या लहानपणी....अगदीच लहानपणाचे आठवत नाही पण जसे समजायला लागले तसे मला दादांच्या (माझे वडील आम्ही त्यांना दादा म्हणतो ) चपलेचे ( नाकाची चप्पल) भयंक आकर्षण....it was always a comfort in it

आमचे दादा साधे सिम्पल ...पांढरा सदरा आणि त्यावर किंचित काळी/करडी तत्सम संगाची विजार.. असा त्याचं पेहराव...जेव्हा पासून मला आठवते तेव्हा पासून पांढरा सदरा हा fix...अजूनही तसेच...साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा त्यांचा नियम..(...उच्च विचारसरणी ठीक आहे पण साधी राहणी :(.. तेही कॉलेजात गेल्यावर ......)

मोठी family ..सुरुवातीला सर्व मुली, मग मी आणि लहान दोघे...एवढ्या सर्वांकडे लक्ष देणे...शेती...नोकरी.. आजी आजोबा ....लहान काका ....अशा त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी आम्हाला लहानाचे मोठे केले...आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच...नोकरीत कसले भागते.. त्यामुळे शेती आणि प्लॉट चा व्यवसाय...ह्यासर्वात त्यांना आमच्यासाठी फारसा वेळ नसायचा...काही हवे असेल तर आईला सांगायचे आणि मग मूड बघून ती दादांना सांगणार....फालतू लाड चालत नसत....दिवाळीचा ड्रेस आणि शाळेचा गणवेश हेच काय तर दोन ड्रेस वर्षातून एकदा मिळत.

दादांचा सुरुवातीपासूनच धाक ....प्रगती पुस्तकावर सही आणि शाळेची फी...एवढ्याच विषयावर काय ते बोलत असू ....दिवस भरात एकदा तरी नक्की विचारणार....काय रे अभ्यास कसा चाललाय ?...बघू तुझी वही ????....मित्रही घाबरायचे :)

दादा स्वतः पुण्यात शिकले ...त्यांच्या काळात... म्हणजे जवळपास ५० वर्षापूर्वी...छोट्याशा खेड्यातून...किमान ३०० किलोमीटर दूर असलेल्या पुण्यात ते आले...परिस्थितीमुळे शिक्षण सोडले आणि नोकरीला लागले...बाहेर पडल्यामुळे विचार बदलले...मला नेहमी सांगत ....भाऊ आपली संपत्ती म्हणजे आपले शिक्षण...आपल्याकडे दुसरे काही नाही जे तुला पुढे घेऊन जाईल...

लहानाचा मोठा झालो ...कॉलेजला गेलो...तेव्हा मात्र आमचे वाद व्हायला लागले....कारण त्यांचे सर्वच नियमात....आणि आपला सगळाच गोंधळ (हे त्यांचे मत...).. मग काही जमेना...शाब्दिक चकमकी तर वरचे वर होत...मग आईच काय तो मार्ग काढत असे. होस्टेल मध्ये राहायचो..महिन्याचा खर्च मागितल्या पेक्षा नेहमी कमीच मिळायचा...ते त्यांच्या काळातले calculation करायचे...आणि ते काही आमच्या काळात match होत नसायचे.......मग पुन्हा चिडचिड....त्यांचीही आणि आमचीही......मी एक पेन ५ वर्षे वापरला आणि तुम्हाला तुमच्या साध्या वस्तू सुद्धा सांभाळता येत नाहीत ???....मग... पैसे कमवायची अक्कल नाही...... वगैरे....... ऐकावे लागायचे....खरे सांगायचे तर फार राग यायचा....मनात यायचे ह्यांना प्रत्येक गोष्टीत आपल्या चुकाच दिसतात ........असे अनेक किस्से.....एकदा तर महिनाभर बोललो नाही आम्ही...........मला तर दादाच चुकीचे वाटायला लागले ..

आज इतक्या वर्षानंतर हे सारे काही आठवते आहे जसे च्या तसे .....आता मीही बाबा झालोय....bread & butter च्या मागे धावतोय..... जबाबदारीत कुठे कमी नको पडायला ह्याची काळजी घेतोय...... कामाच्या व्यापात मुलांना फारसा वेळ देत नाही खरा .... पण करणार काय.....काळ बदललाय ...स्पर्धा......माझं करियर....वाढती महागाई......सर्व गणितच बदललेय.......

तशी परिस्थिती चांगली आहे ......मुलाने काहीही मागितले तरी लगेच घेऊन देऊ शकतो......पण देत नाही...कारण त्याच्या सर्वच demand योग्य वाटत नाही...games ..CD 's ...PSP ....कशाला हव्यात नसत्या भानगडी ?.....मागितले आणि मिळाले कि त्याची किंमत राहत नाही......मनात येते ....मी एक bag ३ वर्षे वापरली आणि ह्याला प्रत्येक वर्षी नवीन bag ....रागावलो कि मीही बडबडतो.... अभ्यासाचे काय ???......शाळेला दांडी मारायची नाही....TV थोडा कमी बघा आणि अभ्यासात लक्ष घाला .....फालतू लाड नाही चालणार....बायको बोलते...लहान आहे रे तो.....समजेल त्याला सर्व काही थोडा मोठा होऊदे ....मलाही कळते सारे....असेही रागवताना मला का आनंद होतो ? ...पण प्रसंगी कठोर व्हावेच लागते ......जग बदलतंय.... मोठा झाल्यावर ह्या जगाला तोंड देण्याची हिम्मत हवी...आणि ती आपणच दिली पाहिजे......मी आहेच त्याच्या पाठीशी....पण माझ्याशिवाय चालला तरच माझ्यातला बाबा जिंकेल .....माझे रागावणे दिसते पण त्या मागची काळजी, प्रेम हे नाही दिसत कोणाला.......आणि हा सारा आटापिटा त्यांच्यासाठीच ना ....

आता कळतंय... मला रागवताना दादानाही कुठे आनंद होत असेल...त्यानाही हेच वाटत असेल जे आज मला वाटते आहे.....मीही दादांसारखा वागायला लागलो आहे .....माझ्या बोलण्यात, चालण्यात त्यांना अनुभवतोय......प्रत्तेक दिवस मी त्यांना माझ्यात जगतोय....now I am in my Daddy 's shoes, can feel the same comfort.

Yeah.....everyday i see....a little more of father in me !!!!!!!!

कदाचित त्त्यामुळेच सर्व मुलांना बाबाच्या बुटाचे आकर्षण असेल ....कारण कधीतरी...तोही त्या बुटात उभा राहून जगाकडे बघणार असतो आणि बाबाचे आयुष्य, स्वप्न जगणार असतो....माझां मुलगाही मला समजून घेईल...when he will be in my shoes !!!!!!!!!!!!!!!!

आता दादा मित्रासारखे वाटतात....नव्हे मित्रच झालेत ते.....Happy Birthday Dad !!!!!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा